06 February 2019

हडपसर, खराडीत घरांसाठी १३७ कोटी

पुणे - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून हडपसर आणि खराडीत उभारण्यात येणाऱ्या पावणेदोन हजार घरांसाठी १३७ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीत मंगळवारी मंजूर झाली. 
स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आखली असून, त्याअंतर्गत शहरातील वेगवेगळ्या सात भागांत घरांची बांधणी करण्यात येणार आहे. त्यात हडपसरमध्ये ३४० आणि खराडीत १ हजार ४०६ घरे बांधणीचे नियोजन आहे. यातून हडपसरमधील सर्व्हे क्रमांक १०६ अ (हिस्सा क्रमांक १६ ते १८ ब) येथे घरे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविली होती; परंतु प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ दिली होती. मात्र, २७ कोटी १४ लाख १३ हजार रुपयांची निविदा स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आली. त्यानंतर खराडीत येथे सर्व्हे क्रमांक ५७/५ मधील घरांसाठी सुमारे ११० कोटी ५५ लाख ९९ हजार रुपयांची निविदा मंजूर  झाली.
मात्र, येथील जागा ताब्यात नसल्याचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्तावाला विरोध केला. त्यानंतर बहुमताने तो मंजूर झाल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.
sourace sakaal

Featured Post

3 bhk sale majestique marbella kharadi pune

  Area                                   Project     1080  sft   carpet              Majestique Marbella                          Floor     ...