Dec 25, 2020

दीर्घ कालावधीच्या भाडेकरारांनाही मुद्रांक शुल्कात सवलत

 राज्य सरकारने ३१ डिसेंबपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के  कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ २९ वर्षांपेक्षा अधिक वर्षांच्या भाडेकरारांनाही मिळणार आहे. याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे २९ वर्षांपासून ९९ वर्षांपर्यंतच्या भाडेकरार करणाऱ्यांना मुद्रांक शुल्कात दिलासा मिळाला आहे.

याबाबत नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख म्हणाले, मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आल्याने दस्त नोंदणी वाढली आहे. या निर्णयाचा लाभ २९ वर्षांपेक्षा अधिक वर्षांच्या भाडेकरारांना देखील देण्यात येणार आहे. यापूर्वी काही मोठय़ा गृहप्रकल्पांना मुद्रांक शुल्कात कपातीचा लाभ देण्यात आला आहे. संबंधितांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.

दरम्यान, नोंदणी अधिनियमानुसार नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यानंतर पुढील चार महिन्यांत केव्हाही दस्त नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी करता येते. त्यानुसार ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांना पुढील चार महिन्यांमध्ये दस्त नोंदणी करता येणार आहे. मात्र, संबंधित दस्तांवर ३१ डिसेंबरपूर्वीची तारीख, मालमत्तांची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांची स्वाक्षरी अत्यावश्यक आहे. ते दस्त १ जानेवारीनंतर चार महिन्यांत के व्हाही दस्त नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन नोंदवता येणार आहेत.

Featured Post

Online Registered Rent Agreement Notory Registration Agreement in Pune Call us +91-9881160036

We Make online Rent Agreement, Notary, Registration of Rent Agreeement,  Brokerage Bill, Brokerage Receipt,  We give home loans in Pu...